बेटरमेंट चार्जेस ५० टक्क्यांनी होणार कमी आचारसंहितेनंतर सादर होणार प्रस्ताव; गुंठेवारीधारकांना मोठा दिलासा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : शहरातील गुंठेवारी भागातील भूखंडांचे 'बेटरमेंट चार्जे स' कमी करण्यासाठी अखेर महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होणाऱ्या मागणीची दखल घेत मनपा हे शुल्क तब्बल ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या तयारीत आहे. सीएसएमआरडीएने गुंठेवारी शुल्कात दिलेल्या ९० टक्के सवलतीच्या धर्तीवरच हा निर्णय घेतला जाणार असून, नगररचना विभागामार्फत तयार
करण्यात आलेला हा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आगामी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका हद्दीतील डिसेंबर २०२० पूर्वीची बांधकामासाठी बेटरमेंट चार्जेस पूर्णतः माफ केलेले आहे, तर ओपन अनधिकृत बांधकामे व भूखंडांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करून घेण्यात येत आहे. प्लॉटसाठी (भूखंड) १०० टक्के बेटरमेंट चार्जेस आकारण्यात येत आहे. विभागीय आयुक्त तथा सीएसएम आरडीचे
यशपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
आयुक्त जी श्रीकांत यांनी पदभार घेतल्यानंतर मनपा असलेल्या हद्दीबाहेर गावांमधील अनधिकृत बांधकामे व भूखंड गुंठेवारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू केली. प्राधिकरणाने भूखंड
नियमितीकरणासाठी बेटरमेंट चार्जेसवर ९० टक्के सूट जाहीर केली. त्यामुळे सध्या केवळ १० टक्के शुल्क आकारण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने मात्र खुल्या जागेच्या
२२ जूननंतर प्रस्ताव
महानगर प्राधिकरणप्रमाणे भूखंडाच्या गुंठेवारीसाठी बेटरमेंट चार्जेसमध्ये सूट देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. नगररचना विभागाकडून तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. बेटरमेंट चार्जेसवर ५० टक्के सूट देण्यात यावी, असे प्रस्तावात मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव आगामी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सध्या विधान परिषदेची आचारसंहिता लागू असून, २२ जूननंतर आचारसंहिता संपेल, त्यानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर हा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रानी दिली आहे.
गुंठेवारीसाठी १०० टक्के बेटरमेंट चार्जेस आकारले जात आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून ओपन प्लॉट गुंठेवारी अंतर्गत नियमित करून घेण्यासाठी
अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच शहरातील ज्या भागांमध्ये रेडीरेकनर दर कमी आहेत, त्याच भागातील बांधकामे नियमित करून घेतले जात आहेत.
https:llepaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions